अशा मुलाखतीमध्ये तोच तो पणा जाणवत असेल तर त्याच्या कडे पुनर्भेट म्हणून पाहावे.

एखाद्या वाहिनीवर एखाद्या मालिकेचे प्रसंग अनेक दिवशी निरनिराळ्यावेळी पुन्हापुन्हा दाखवतात. काही महिन्यांनंतर दुसरा एखादा वाहिनीवाला तेच प्रसंग पुन्हा असेच अनेकदा दाखवतो ते पाहताना आपण कसे पाहतो?

पूर्वी दूरदर्शनवर असे कार्यक्रम पुनर्भेट म्हणून दाखवायचे. आपण अशा कार्यक्रमांकडे पुनर्भेट म्हणून पाहावे. ज्यांना पुन्हा बघावेसे वाटतील ते बघतील, असे मला वाटते.