आशाबाईंचा गाण्याचा इतिहास खूपच रोचक जरी असला तरी नव्या लोकांना नव्या बाजाच्या, धाटणीच्या गोष्टी हव्या असतात.... त्याच त्या चावून चोथा झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायला कंटाळाही येत असेल .... आधुनिक शैलीत गाणे, त्याचे लाईव्ह प्रेझेंटशन [सादरीकरण], त्यासोबत सादर केले जाणारे नृत्यादी कार्यक्रम, संगीत रिऍलिटी शोज, आशाबाईंचे मराठी- हिंदी सोडून इतर भारतीय भाषा, पाश्चात्य किंवा परदेशी भाषांमधील गाण्याचे योगदान - तेथील संगीतकारांबरोबरचे, वादक -सहगायकांबरोबरचे अनुभव, त्यांची सध्याच्या काळातही असणारी पारंपारिक पण फॅशनेबल वेषभूषा तसेच आशाबाई - ए बिझिनेस वूमन, अशा गोष्टींबद्दलही त्यांना प्रश्न विचारले जावेत.... किंवा त्यांची संगीतक्षेत्राशी निगडित, बॉलिवुडशी निगडित मते, गॉसिप
इ. इ. अशा ''रुचकर'' गोष्टीही कदाचित प्रेक्षकांना आवडू शकतील!!