मोल्ज़वर्थचा शब्दकोश पाहिला. त्यात आपण सुचवल्याप्रमाणे अर्थाचा खुलासा झाला. खुलासा रोचक आहे.
मात्र, मोल्ज़वर्थच्या सदर शब्दकोशाचे प्रकाशन १८५७ साली झाल्याचे कळते. आजच्या घडीसही 'डुबूक' हा शब्द 'काठोकाठ भरलेले' अशा अर्थाने वापरला जातो किंवा कसे, याबद्दल काही खात्रीलायक माहिती कोठे उपलब्ध आहे काय, असे कुतूहल वाटते.