जावेद अख्तर हे गाडगीळ किंवा भाऊ मराठे यांच्याइतकेच जुने, अनुभवी आणि बुद्धिमान व्यक्तीमत्व आहे.
 जावेद अख़्तर ह्यांची पार्श्वभूमी अतिशय वेगळी आहे. त्यांचे आजोबा प्रसिद्ध कवी रियाझ खैराबादी. वडील जांनिसार अख़्तर. ते आधुनिक उर्दू कवितेतले मोठे नाव. मामा मजाज़ लखनवी आणि सासरे कैफी आझमी हेदेखील मोठे कवी.  स्वतः जावेद चांगले कवी आहेत. त्यांनी १९५३ साली शबनम ह्या चित्रपटापासून गीतकाराची कारकीर्द सुरू केली. (ह्या चित्रपटातली ये तेरी सादगी ये तेरा बाँकपनजाने--बहार जाने-चमन (हाय)तौबा शिकन ... आणि मैंने रख्खा है मोहब्बत अपने अफ़साने का नाम ही गाणी माझी आवडती.)

गाडगीळ व मराठे ह्यांना अशी पार्श्वभूमी नाही. कुठे जावेद अख़्तर आणि कुठे गाडगीळ-मराठे.



१. ना किसीका आँख का नूर हूं ह्या ओळी रियाझ खैराबादींच्या ओळी. बहादुरशहा ज़फ़रच्या नावे खपविल्या जातात, असे म्हणतात.