मानस हा उपक्रम सुरेख आहे.
उर्दू भाषेचा अंदाज काही वेगळाच आहे. त्यातून गालिबची शायरी म्हणजे तर कहर आहे. मी उर्दूचा लहानपणा पासून चाहता आहे. मला या गजलचा समजलेला अर्थ असा आहे:
दर्द मिन्नतकशे दवा न हुआ
मै न अच्छा हुआ, बुरा न हुआ
मिन्नत म्हणजे विनवणी, दर्द मिन्नतकशे दवा न हुवा म्हणजे या दुखाःची विनवणी औषधानी मानली नाही.
यात आणखी गहिरा रंग आहे, मी स्वतःच दुखः आहे आणि माझी प्रिया मेरी राहत आहे, माझी मिन्नत तिनी मानली नाही! आणि मी या प्रेमातून बाहेर येऊ शकलो नाही, म्हणून आयुष्यभर असाच अस्वस्थ राहिलो (मैं न अच्छा हुआ) पण... आता इथे गालिब अर्थापलिकडे जातो... या अस्वाथ्यानी मी निराशही झालो नाही कारण तिची अनावर चाहत हेच तर माझं आयुष्य आहे! (बुरा न हुवा)
गजलचा एक सुफ़ियाना अंदाज असतो. सुफ़ींच्या मते ईश्वरही प्रेयसी आहे आणि सुफीची बंदगी ही प्रित आहे, त्यांना ही ओढच ईश्वरापेक्षाही प्रिय आहे कारण तिच तर खरी जगण्याची मजा आहे. त्यामुळे एका शेराला दोन्ही परिमाणे असू शकतात आणि जिथे ही दोन्ही परिमाणे दिसतात ती शायरी मिस्टीकल होते.
जम्मा करते हो क्यूं रकीबो को
इक तमाशा हुआ, गिला न हुआ
तुला जर मी मंजूर नसेन तर असं सगळ्यां देखत सांगू नकोस, माझ्याशी बोल!
है खबर गर्म उनके आने की
आजही घरमे बोरिया न हुआ
ती आज नक्की येणार आहे पण तिला द्यायला आज माझ्याकडे काहीही नाही!
कितने शीरी है तेरे लब के, रकीब,
गालिया खाके भी बे-मझा न हुआ
तुझे ओठ इतके गोड आहेत की तू केलेल्या अपमानानी देखील लोक नाउमेद होत नाहीत.
क्या वो नमरुद की खुदाई थी,
बंदगी मे मेरा भला न हुआ
ही आशिकी मला आज कुठे घेऊन आली असं वाटतं की प्रेम केलं नसतं तर सुखी झालो असतो.
जान दी; दी हुई उसीकी थी,
हक तो ये है के, हक अदा न हुआ
हा सुफियाना अंदाज़ आहे! हे श्वास मी तुला दिले कारण ते तुझेच होते, तूच मला दिलेले होतेस. तुझ्यामुळेच मी जगत होतो. पण दुखः हे की या तुझ्या अनामतीवर तू तुझा हक्क सांगीतला नाहीस! तू मला तुझा मानला नाहीस.
संजय