"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टी, घटना अश्या घडत असतात, की ज्यामध्ये कमालीचा योगायोग असतो. आता हे बघा ना, एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या मुलानं/मुलीनं एखाद्या मुसलमान मुलीशी/मुलाशी प्रेमविवाह करावा, अगदी सोवळंओवळं पाळणार्या घरातल्या मुलांनी आंतरजातीय विवाह करावे, हे आणि असे अनेक विचित्र योगायोग रोजच्या रोज घडत असतात. जगातल्या मोठमोठ्या माणसांनाही हे असले विचित्र चेष्टाप्रद योगायोग चुकले नाहीत. अहिंसावादी म्हटले जाणारे गांधी बंदुकीच्या गोळीने मेले. कार्ल मार्क्सचा साम्यवादावरचा ग्रंथ कोणी प्रकाशक मिळेना म्हणून एका भांडवलदाराच्या ...