जे शब्द आपण आज अश्लील समजतो ते पूर्वी अश्लील समजले जात नसावेत. उदा. दासबोधातल्या मूर्खलक्षणे सांगणाऱ्या या ओव्या बघा.

देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड ।
ज्याचे मुखी भंड उभंड । तो येक मूर्ख ॥

किंवा ही दुसरी बघा.

लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटील निचाड ।
निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥

यात "लंड" हा शब्द " द्रोही" या अर्थाने वापरला आहे असे वाटते. आजोबांचे श्राद्ध करायचे की नाही यावरून  एकदा आजी आणि वडिलांचे भांडण चालले असताना (वडील ते करायच्या विरुद्ध होते आणि आजी करायच्या बाजूने) ती वडिलांना "तुम्ही लोक धर्मलंड आहात" असे रागाच्या भरात म्हणाल्याचे (आणि मी मोठ्या कष्टाने हसू आवरल्याचे ) आठवते.

विनायक