हिंदीभाषकांच्या मुखी लंडनचे लंदन झाले हे आपले निरीक्षण योग्यच आहे. कदाचित कानाला खटकणाऱ्या ध्वनिसमूहाचा एक शब्द म्हणून उगम हिंदीतून झाला असावा का?
कदाचित त्यामुळे हिंदी कान या ध्वनिसमूहाच्या बाबतीत थोडे अधिक संवेदनाशील (सेन्सिटिव) असावेत का? या प्रश्नांची खात्रीलायक उत्तरे माझ्याजवळ नाहीत, परंतु या दिशेने शोध घेतल्यास बहुधा काही उद्बोधक माहिती हाती लागावी अशी शंका आहे.