जालावर सापडलेले उपाय :
आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळसंध्याकाळ दिवसातून दोन वेळा घ्यावा. आठपंधरा दिवसांत आम्लपित्त थांबते. ताजा आवळा नसताना पूडसुद्धा चालते.
*पोटात आग होणे हे पित्त वाढल्याचे एक लक्षण आहे. तिखट-तेलकट वर्ज्य केले आहे ते चांगलेच आहे. दिवसातून चार-पाच वेळा थोडे थोडे खाण्याकडे लक्ष द्यायला हवे. भुकेकडे दुर्लक्ष होता कामा नये. दोन जेवणांव्यतिरिक्‍त इतर वेळेला साळीच्या लाह्या खाणे उत्तम होय. यामुळे भूकही भागते व पित्तही कमी होते. आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा पुरेसा प्रमाणात समावेश असू द्यावा. प्रवाळ, अनंत, मोती वगैरेंनी युक्‍त पित्तशामक गोळ्या घेण्याचा, तसेच रोज सकाळी गुलकंद खाण्याचाही उपयोग होईल.
*आम्लपित्त : बैद्यनाथ सुतशेखर रस १-१ गोळी दिवसातून २-३ वेळा घ्यावी. बैद्यनाथ दाडीमावलेह ४-४ चमचे दोन ते तीन वेळा घ्यावे. सोबत बैद्यनाथ गिलोयसत्व २५०मिग्रॅ. पाण्यासोबत घ्यावे.


ह्याशिवाय आंतरजालावर आपण ''Acidity'', ''Indian'', ''Home Remedies'' नावाने शोध घेतल्यास आपल्याला बरीच उपयुक्त माहिती कळू शकेल.