अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

बुधवारी सकाळी आइसलॅन्डमधल्या ‘ एव्हलूब ‘ ( Eyjafjallajokull) (उच्चार यू ट्यूब वरून घेतला आहे. चू.भू.द्या.घ्या.) ज्वालामुखीचा एका महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा उद्रेक झाला. मागच्या महिन्याच्या मानाने या उद्रेकाची तीव्रता बरीच जास्त आहे. कालपासून हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात राख व छोटे दगड, खनिज कण व कांचकण यासारखे इतर घन पदार्थ आकाशात फेकून देत आहे. या फेकून देण्याची तीव्रता इतकी अधिक आहे की या राखेचा ढग अंदाजे 20000 फूट उंचीवरून आग्नेय दिशेला पसरत चालला आहे. वार्‍याची दिशा हीच असल्याने, अमेरिका खंड या राखेच्या ढगापासून वाचले असले तरी ...
पुढे वाचा. : आइसलॅन्ड मधला ज्वालामुखी उद्रेक