आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे.

आम्लपित्त : बैद्यनाथ सुतशेखर रस १-१ गोळी दिवसातून २-३ वेळा घ्यावी. बैद्यनाथ दाडीमावलेह ४-४ चमचे दोन ते तीन वेळा घ्यावे. सोबत बैद्यनाथ गिलोयसत्व २५०मिग्रॅ. पाण्यासोबत घ्यावे.

पण आवळा, सूतशेखर रस, दाडीमावलेह किंवा गिलोयसत्व (यातील पहिली वगळता इतर चिजा ज्या काही असतील त्या) या वस्तू जेथे मुळात मिळतच नाहीत, किंवा चुकून मिळाल्याच तरी दर्जा आणि किती वर्षे जुन्या असतील याची खात्री नसते आणि किमती अवाच्यासवा असू शकतात, अशा ठिकाणी सापडलेल्या मनुष्याने काय करावे? मला वाटते मूळ प्रश्नकर्त्याची अडचण ही असावी.

आम्लपित्ताकरिता सोडा (खाण्याचा किंवा पिण्याचा) चालावा काय? मला वाटते तो कोठेही मिळावा.