महेशशी सहमत. तसेच मतल्यातील पहिली ओळही खटकते.
जिथे जिंकायचे होते तिथे मी हारला गेलो
"मी हारला गेलो" हा शब्दप्रयोग चुकीचा वाटतो. 'मी हरवला गेलो ' हा तुम्हाला अभिप्रेत अर्थ कळला पण 'हारला गेलो' खटकतंच. हेच काहीसे '... फुत्कारला गेलो' विषयीही वाटते. कर्तरी प्रयोग व कर्मकर्तरी प्रयोग ह्यांचा घोळ होत आहे. फुत्कारणे हे सकर्मक (ऍक्टिव्ह वॉईस) हवे , त्याचा असा पॅसिव्ह वॉईसमध्ये वापर पहिल्यांदा पाहतो आहे. ह्यावर जाणकार मनोगती मार्गदर्शन करतील काय?

दुसरा शेर आवडला.