... हे बहुधा पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर त्रास देते. म्हणून प्रथम या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक असते. थंडीच्या दिवसात मुळातच पित्त अधिक प्रमाणात स्त्रवत असते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीराला हवी असणारी ऊब नैसर्गिकतः तयार करण्याची शरीरातील व्यवस्था. याकरिता भूक लागली की थोड्या प्रमाणात पिष्टमय पदार्थ अधूनमधून खावेत. पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये. थंड पाणी हे साधारणतः उच्च रक्तदाबास कारण होते, असा माझा अनुभव आहे. पाणी गारपणा मोडलेले घेणे नेहमीच चांगले. दही, लिंबू, चिंच, असिडिक द्राव (व्हिनेगर, सॉस वगैरे) घेऊ नयेत.
          पोटात जळजळ, कांही प्रमाणात गॅसेस् होणे, छातीच्या मध्यात बरगड्यांच्या त्रिकोणात दाबले असता दुखणे असा त्रास होत असेल, तर एक साधा उपाय मी करतो. डायजिनच्या एका गोळीचे चार तुकडे करायचे. सोडामिंटच्या गोळीचे दोन तुकडे करायचे. या दोन्ही गोळ्या औषधाच्या दुकानात कुठेही मिळतात. पाव गोळी डायजीन व अर्धी गोळी सोडामिंट चोखावी. कांही वेळातच त्रास शांत होतो. हा उपाय सोपा, कुठेही करता येण्याजोगा, स्वस्तातला आणि अपायकारक नसलेला असा आहे.
            (पित्ताचे प्रमाण जास्तच वाढलेले असेल, तर पाणी पिऊन वमन (उलटी) करून ते काढून टाकता येते. )