@ महेशराव
असा कंटाळलो होतो स्वतःच्याही तराण्यांना
दिल्या छेडून तारा तू पुन्हा झंकारला गेलो
आपण म्हणाल्याप्रमाणे दिल्यास असायला हवे हे प्रकर्षाने जाणवत आहे. आपण तो असा लिहू या..
असा कंटाळलो होतो स्वतःच्याही तराण्यांना
जशा तू छेडिल्या तारा, पुन्हा झंकारला गेलो
@ मिलिंदसाहेब,
हारला गेलो व फुत्कारला गेलो... हे तृतीय पुरुषी होत आहे..... फुत्कारलो... व हारलो हे योग्य आहे पण आपण म्हणाल्याप्रमाणे इथे घोळ निश्चित आहे.. गजल जरा फसलीच म्हणायची.
दुसरा शेर आवडल्याबद्दल... धन्यवाद.
डॉ.कैलास