सांगत्ये ऐका... येथे हे वाचायला मिळाले:
..आज सकाळी उशीरा जाग आली. नवर्याला ८:३० ची मीटिंग होती, मला ९ चा एक इंटरव्यु. नवरा घाई-घाई आवरुन पळाला. रोज सकाळी जी काय थोडी-फार कामं तो करतो ती पण न करता. उशीरच झाला मग त्याला इलाज नाही. लेकाला डब्यात बटाट्याचे पराठे द्यायचे म्हणून त्याची तयारी केली होती. पटकन दोन पराठे लाटु (एक त्याला, एक मला) म्हंटलं तर लेकाने नेमकच एकदा शी केली आणि एकदा अंगावर पाणी सांडुन घेतले. बर्नर बंद करा, त्याचे आवरा आणि परत कामाला लागा. डबे भरत होते तेव्हा त्याला काय खायला दिले होते ते सगळे अंगावर माखुन घेतले. परत त्याला ...