काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी आई ताटामधे तांदुळ घेउन निवडायला बसली, आणि निवडणं झालं की थोडे तांदुळ खिडकीमधे फेकायची. थंडीचे दिवस, सकाळचं कोवळं उन्हं, आणि त्या उन्हात चिमण्या येउन ते तांदूळाचे दाणे टिपायच्या. ती भुरकट रंगाची चिमणी हल्ली फार कमी दिसते.
पुर्वी आई लहान बाळाला मांडीवर घेउन कविता म्हणायची, चिऊ ये, काऊ ये, दाणा खा……… त्यातली खरी खरी चिऊ दाखवायला तरी शिल्लक राहिली तर बरं, कारण
चिमणी
आजकाल हा पक्षी फारच दिसणे तर फारच दुर्मिळ झालय . स्पेशली मुंबईला तर फक्त कावळे आणि कबुतरंच दिसतात , चिमणी कधीतरी चुकुन एखाद्या वेळेस दिसली तर ...
पुढे वाचा. : घरटी लावा- पक्षी वाचवा…