समीर अंजान ह्यांचे सुपुत्र. तेच खैके पान बनारसवाला वाले.
साहिरलाही त्याच्या कविमित्रांनी अनेक गाणी
दिली आहेत
ह्याविषयी थोडे अधिक जाणून घेण्यास आवडेल.
जाँनिसार अख्तर आणि साहिर चांगले मित्र होते. साहिरने जे काही रोम्यांटिक म्हणून काही लिहिले ते जाँनिसार अख्तरने लिहिलं आहेत असे म्हणतात. निदा फ़ाज़ली ह्यांनी जाँनिसार अख़्तर ह्यांच्या एका पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत ह्याबद्दल लिहिले आहे. ते पुस्तक मिळवायला हवे. मिळेल तशी माहिती देईन. तूर्तास एवढेच
कारण साहिर हा माझा सॉफ्ट स्पॉट आहे!
साहिर हा मलाही आवडतो. साहिरबद्दल इन्किलाबच्या संपादक इर्तजा निशात
ब्लिट्झचे संपादक ह्यांनी लिहिले आहे:
उर्दू अदब के साथ रही पस्तियाँ बहुत
साहिर की इक किताब बिकी तल्खियाँ बहुत
अति अवांतर: आपण ह्याच धाग्यात इतरस्त्र उल्लेखिलेला 'शबनम' मला वाटते १९६४
सालचा आहे. (१९५३ चा ह्या उल्लेखाने जावेद अख्तरची कारकीर्द ११ वर्षांनी
वाढत आहे, केवळ म्हणून हे इथे दर्शवण्याचा प्रपंच केला आहे).
चूक झाली आहे खरे. (दुवा क्र. १ इथला रॉ डेटा फार डोके न लावता टाकला) जावेद अख्तर १९५३ साली आठ वर्षांचेच असतील. त्या वयात वरील दोन गाणी सुचणे अशक्यच वाटते :) पण तरीही त्यावेळी तो केवळ १९ वर्षाचा होता