माझा आधीचा प्रतिसाद दिलसे ह्यांच्या प्रतिसादातल्या "जावेद अख्तर हे गाडगीळ किंवा
भाऊ मराठे यांच्याइतकेच जुने,
अनुभवी आणि बुद्धिमान व्यक्तीमत्व आहे." ह्या वाक्याला दिलेला आहे. तो ह्या लेखाला दिलेला नाही किंवा दिलसे ह्यांच्या संपूर्ण प्रतिसादावरही नाही. ह्या तिघांपैकी कोण अधिक चांगला मुलाखतकार हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे, असे वाटते.
जावेद अख़्तर ह्यांचा तरकश हा संग्रह मी वाचला आहे. तो मला आवडला. त्यातली भूख ही कविता अवश्य ऐकावी. (गाण्यांवरून मी त्यांना
चांगला कवी समजत नाही.)
बाकी तुम्ही संगीतकार पितापुत्रांवर एकत्र दिलेली माहिती चांगली आहे. युक्तिवादही नेहमीचा व बिनतोड आहे. असो. आणखी माहिती येऊ द्या. शुभेच्छा!