सहज कुतूहल म्हणून संबंधित शब्दाचा अर्थ जालावरील संस्कृत, हिंदी आणि मराठी शब्दकोशांत शोधून पाहिला. उपलब्ध झालेली माहिती रोचक आहे.
संस्कृत: हा शब्द, किंवा हा शब्द उपसर्ग किंवा प्रत्यय या रूपांत किंवा अध्येमध्येही असलेला दुसरा कोणताही शब्द, जालावरील उपलब्ध संस्कृत शब्दकोशांत सापडला नाही. (अर्थात त्यामुळे त्या शब्दकोशांच्या मर्यादेव्यतिरिक्त इतर काहीही सिद्ध होऊ शकत नाही हा भाग वेगळा.)
हिंदी: जालावरील उपलब्ध हिंदी शब्दकोशांपैकी एका शब्दकोशात दोन अर्थ सापडले. ( अर्थ १.१ अर्थ १.२ ) उर्वरित सर्व शब्दकोशांत एकच अर्थ सापडला. ( अर्थ २.१ ) अर्थ २.१ हा अर्थ १.२शी बऱ्यापैकी मिळताजुळता आहे.
मराठी: मोल्ज़वर्थच्या शब्दकोशात हा शब्द, तसेच हा शब्द उपसर्गस्वरूपात, प्रत्ययस्वरूपात अथवा अध्येमध्ये असलेले सर्व शब्द यांवर एकत्रच शोध घेतला. फलितस्वरूपी हा शब्दही मिळाला, आणि इतरही अनेक रोचक शब्द सापडले. ( शोधसूत्र )