या निमित्ताने कविताही वाचल्या जातील असे वाटते. आताच उपलब्ध सर्व कविता
वाचून प्रतिसाद दिले आहेत.
- विडंबक परिवारातर्फे तुमचे मी आभार मानतो. आमच्याकडून तुम्हास हा ।_।o कपभर चहा बक्षीस.
एकाच प्रतिसादकाचे पाच प्रतिसाद, त्या कवितेला विडंबनक्षम करण्यास चालतील
किंवा कसे याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
- हीच शंका मलाही आली आहे. एखाद्या काव्याचे विडंबन करायचा अनिवार मोह झाल्यास
विडंबनानिमित्त प्रतिसाद क्रमांक १
विडंबनानिमित्त प्रतिसाद क्रमांक २
विडंबनानिमित्त प्रतिसाद क्रमांक ३
विडंबनानिमित्त प्रतिसाद क्रमांक ४
विडंबनानिमित्त प्रतिसाद क्रमांक ५
असे मीच त्यास पाच प्रतिसाद दिले तर ते प्रशासनास चालेल काय?
हे जर धोरणात बसत नसेल तर पाच वेगवेगळ्या आयडिंनी पाच प्रतिसाद दिले तर चालतील काय? की आयपी पत्ता तपासून ते बाद केले जातील? प्रॉक्सी सर्व्हर किंवा टॉर वापरण्यास प्रोत्साहन देणे हा तर या धोरणात्मक ढवळाढवळीमागील प्रशासनाचा सुप्त उद्देश नाही ना? की जुने कंपू व कंपूबाजी यांचे पुनरुज्जीवन/पुनरुत्थान हा प्रशासनाचा शुद्ध व निर्मम हेतू आहे?
असे अनेक प्रश्न मनात आलेत परंतु प्रशासकीय धोरणानुसार ते अनुत्तरित राहण्याचीच शक्यता अधिक आहे. अहो, मनोगताचे अघोषित ब्रीदवाक्यच "मौनम् सर्वार्थ साधनम्" आहे, त्याला कोण काय करणार?