॥ शिवकालाक्ष ॥ येथे हे वाचायला मिळाले:
परवा-परवाचीच गोष्ट. दि.२७ डिसेंबर १९९८ च्या 'मुंबई सकाळ' मधे एक लेखआला. त्यांत अनेक मराठी लेखकांची छायाचित्र छापून आली. त्यांत गोंनी. दांडेकरांचही सुंदर छायाचित्र छापून आलंय. पण त्या छायाचित्राखाली नावघातलय् माझं ! बाबासाहेब पुरंदरे ! उघड उघड मुद्रकाचा हा मुद्रणदोष ! पणमला वाटतंय् की, मुद्रकानं अगदी बरोबरच छापल. त्यानं अचूक ओळखलंकी, गो. नी. दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे एकच ! वेगळे नाहीतच अन् तेखरंच होतं. आम्ही हिंडत होतो. खेळत होतो अन् भांडत होतो. तापलेल्यातव्यावर तावातावानं भांडत होतो. त्यामुळं आमचं नातं खरपूस खमंगराहिलं. करपलं कधीच ...
पुढे वाचा. : गूज मन्मनीचे - बाबासाहेब पुरंदरे