तुमच्या आईने विणकामात कमालच केलेली आहे; तेही दृष्टी अधू असून. त्यांच्या या कलेला सलाम.
माझ्याही आईने असे बरेच विणकाम तिच्या तारुण्यात (लग्नाआधी आणि लग्नानंतरची सुरवातीची काही व्रर्षे) केलेले होते. माझी आई अनेक रंगांमध्ये हे विणकाम करायची... उदाहरणार्थ - पांढऱयावर लाल, हिरवा वगैरे...
पुढे अनेक वर्षांनंतर हे विणकाम उंदरांना फारच आवडले व त्यांनी त्याचा यथेच्छ उपभोग घेतला!! पुढे तिने ते रुमाल दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलाही; पण ती तेव्हाची उमेदही तिच्यात उऱली नव्हती आणि नजरही ती तेव्हाची राहिलेली नव्हती.
नाही म्हणायला, आता आईच्या हातचे दोन रुमाल घरात आहेत... पण तेही कुठे कुठे कुरतडलेले. असो.
तुम्ही इथे प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांपैकी ते दोन गोल रुमाल पाहून तर मला आमच्याकडचे ते रुमालच आठवले. संक्रांतीला खास वापरले जायचे ते !
तुमच्या या लेखाने काही आठवणी जाग्या केल्या.
तुमच्या आईचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.
.....
तुमच्या आईचे हे काम जगासमोर येण्याच्या दृष्टीने 'व्यक्तिगत निरोप'मधून एक मोबाईल नंबर पाठवला आहे. तो पाहावा.
धन्यवाद.