धर्मलंड हा शब्द काहीसा अश्लील आहे, असे मोल्सवर्थ  शोधसूत्र ) ने लिहिले आहे ते वर आलेच आहे.  त्यामुळे असले शब्द टाळण्याची प्रवृत्ती समाजात दिसते. मुंबईतील फ़्लोरा फ़ाउन्‍टनजवळील लुंड आणि ब्रॉकली या चष्म्याच्या दुकानाचे  सुधारित नामकरण करण्यामागे हेच कारण असले पाहिजे.
मूळ विषय विसरून भलतीच चर्चा चालली आहे असे वाटते.  परकीय शब्द मराठीत लिहिताना त्यांचे उच्चार मराठी लोकांना करता यावेत यासाठी ते तशा प्रकारे सुधारूनच लिहायला पाहिजेत. जपानला भले काहीजण निप्पॉन म्हणत असतील, आपण जपानच म्हणायचे आणि तसेच लिहायचे. हाच प्रकार पॅरिस, लंडन, इंग्लंड , चीन यांच्या बाबतीत. आज इंग्लंडमध्ये तिथले ५ टक्के इंग्रजही इंग्रजी शब्दांचे शब्दकोशाप्रमाणे उच्चार करत नाहीत, हे सत्य आहे.  आपण इंग्रज माणसाशी बोलताना शक्यतो योग्य उच्चार करावेत, पण भारतीय माणसाशी बोलताना तेच इंग्रजी शब्द भारतीय उच्चाराने बोलावे, ह्यातच सगळ्यांचे भले आहे. वर दिगम्‍भांनी (२१-७-२००६)  लिहिल्याप्रमाणे इंग्रजी उच्चारासाठी प्रमाण मानला जाणारा एकमेवाद्वितीय डॅनियल जोन्‍ज़चा उच्चार कोश  याहून वेगळे काही सांगत नाही. या कोशाची वर्षावर्षाला नवीन आवृत्ती निघते, आणि अधिकाधिक शब्द आणि जुन्या शब्दांचे बदललेले उच्चार यांची कोशात भर पडत असते.(डॅनियल जोन्‍ज़ १९६७ मध्ये वारले. नंतर  तो कोश ए. सी.  गिमसन हे काढत आणि हल्ली लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजचे सुसान रामशरण, म्हणजे एक मूळ भारतीय वंशीय, काढतात.)
--अद्वैतुल्लाखान