'त्या काळी साहित्यविश्र्वात प्रसिद्ध असलेल्या'वागीश्र्वरी'या उच्च दर्जाच्या मासिकाच्या संपादक मंडळाचे बोबडे हे सदस्य होते.'
 
-
असे  असूनही श्री. बोबडे प्रसिद्धीपासून दूर राहिले, हे विशेष वाटते.

अगदी. अगदी.
संपादकीय मंडळात असूनही प्रसिद्धीपासून स्वतःला अलिप्त ठेवणे, तसे खूपच अवघड काम.


सहज  - प्रसिद्धीपासून दूर राहणे वेगळे आणि प्रसिद्धी मिळत असूनही तिच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणे वेगळे. बोबडे यांच्याबाबतीत नेमके काय घडले असावे, याचा आपण फक्त अंदाजच लावत बसायचा. :)

तशा बोबडे यांच्या कविता कुठे प्रसिद्धच होत नसतील, असेही नाही; पण त्यामानाने त्यांना लौकिकार्थाने लोकप्रियता मिळाली नव्हती.

हा लेख इथे सादर केल्यानंतर बोबडे यांच्याविषयीचा उल्लेख माझ्या वाचनात आला.
'एक झाड, दोन पक्षी' हे विश्राम बेडेकरांचे आत्मचरित्र तीन-चार दिवसांपूर्वी चाळत होतो. त्यात बोबडे यांचा उल्लेख आढळला. बेडेकरांनी त्यांच्या कुठल्याशा सिनेमात बोबडे यांच्या दोन कविता आवर्जून घेतल्या होत्या. गाणी म्हणून.

शंकर बाळाजी शास्त्री या नावाचे एक कवी होते. विदर्भातीलच. शास्त्री यांचीही काही पदे बेडेकरांनी त्यांच्या एका नाटकासाठी (बहुदा 'संगीत ब्रह्मकुमारी ') आठवणीने घेतली होती. हे शास्त्रीही मोठे प्रतिभावान कवी होते. जुन्या पिढीतील कवींना प्रकाशात आणण्य़ाचे बेडेकरांचे हे प्रयत्न निश्र्चितच वाखाणण्याजोगे होते.

बेडेकरांचे हे चरित्र दहा-पंधरा वर्षांपूर्वी मी संपूर्ण वाचलेले होते. मात्र, बोबडे यांच्याविषयीचा उपरोल्लेख माझ्या स्मरणातून पुसला गेला होता.