हो पुणे म्हणजे सदाशिव पेठ! दुसरे काय असणार?

फार कशाला, सदाशिव पेठ (किंवा सदाशिव-नारायण-शनवार, किंवा पिनकोड ४११०३०) म्हणजे पूर्वापार सर्वच्यासर्व भटें आणि त्यातही विशेषकरून कोब्रा (किंवा दुसऱ्या शब्दांत, शंभर टक्के साडेतीन टक्के) अशीही एक सार्वत्रिक (म्हणजे पुण्याबाहेर) गोड गैरसमजूत दिसून येते. ती तशीच राहू द्यावी. किंबहुना फोफावू द्यावी. आणि मग ऐकू येणाऱ्या अज्ञानमूलक शेऱ्यांना मनसोक्त हसावे.