ही कविता प्रकाशीत करतांना मलाही खुप मानसिक त्रास झाला.

आपल्या मनातील दुविधेपोटी कवितेची मुस्कटदाबी करायची नाही असे ठरवून प्रकाशीत केली.
मुख्य मुद्दा असा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान/शक्तीमान मनुष्यप्राणी असा का वागतो?
नेमका दुर्बळाच्या/सात्विकाच्या जीवावरच का उठतो?
पुर्वीच्या काळातही शिकार करणारेही नेमके हरिणाच्याच मागे लागायचे. का? तो निरुपद्रवी आणि स्वभावाने गरीब म्हणुनच ना? 
वाघसिंहावर मर्दुमकी गाजवायची इच्छाशक्ती मानवात नाहीच असा अर्थ घ्यायचा का?

या कवितेत "शाकाहार की मांसाहार" हा मुद्दा नाहीच. 
मुद्दा आहे मानवी वृत्तीचा.अर्थात तसा कवितेत व्यक्त झाला की नाही हेही महत्वाचे.