हाथी मेरे साथी बघताना मला असाच एक अनुभव आला होता..

हा सिनेमा मी प्रभातला सर्वात पुढच्या रांगेतून पाहिला. ( सगळ्या आयतांचे समांतरभुजचौकोन दिसत होते ) त्यात शेवटी रामू हत्तीला के एन् सिंगांनी मारलेली गोळी लागते आणि तो मरतो. हे पाहताच माझ्या शेजारचा (बहुधा प्राथमिक शाळेतला) मुलगा रडू लागला.

शेवटी रामू हत्तीवर अंत्यसंस्कार झाल्यावर त्याचा पुतळा उभा करतात असा काहीसा प्रसंग आहे. तो त्या मुलाला फारसा कळला नसावा. त्याला बहुधा आनंद झाला असावा. तो मला हालवून हालवून विचारायला लागला, "सांग ना, रामू हत्ती जिवंत झाला का? जिवंत झाला का?"