बदलत्या समाजाचे चित्र. अशा बदलांची आता तयारी ठेवायलाच हवी. दहा-पंधरा वर्षांपूर्वी मुंबईला जाताना टॅक्सीत एका जर्मन माणसाची ओळख झाली होती . सोबत त्याची पत्नी होती. 'वी हॅव बिकम ग्रॅंडपेरेंटस बिफोर अवर सन्स मॅरेज' असे म्हणून तो केविलवाणे हसला होता. त्याच्या जागी कुणी जोशी, घोरपडे, दातार, पाटील असता तर तो जसे हसला असता तसे. एकूण माणूस सगळीकडे सारखाच.