मराठीत हरणे म्हणजे पराभूत होणे.  आणि हारणे म्हणजे जिंकणे. पण या दुसऱ्या अर्थाने हारणेचा उपयोग आता अप्रचलित आहे. हरणे अकर्मक आहे, पण त्याचे प्रयोजक हरवणे, आणि विरुद्धार्थी क्रियापद हारणे हे दोन्हीही सकर्मक आहेत.   मी हरलो=त्याने मला हरवले=मी त्याच्याकडून हरवला गेलो=त्याने मला हारले=मी त्याच्याकडून हारला गेलो. या सर्व वाक्यांचा 'मी हरलो आणि तो जिंकला' हा एकच आशय आहे. हाच अर्थ जर गझलेत अभिप्रेत असेल तर वाक्यप्रयोग उचित आहे, अन्यथा नाही.
मराठीत संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले फूत्कार हे नाम आहे. अर्थ फुसकारा, रागाने सोडलेला सुस्कारा.  फूत्कारपासून बनलेला मराठी  नामधातू , फुत्कारणे.  हे अकर्मक क्रियापद आहे, त्यामुळे त्याचा कर्मणी प्रयोग सहजासहजी संभवत नाही. परंतु, 'त्याने मला फुत् केले=त्याने मला फुत्कारले=मी त्याच्याकडून फुत्कारला गेलो' अशी वाक्ये करता यावीत. अर्थातच, या शेवटच्या वाक्यातला प्रयोग अशुद्ध असेलच असे म्हणवत नाही.--अद्वैतुल्लाखान