आता हरणा ऐवजी वाघ का खात नाहीत ते ज्याने दोन्ही खाल्लेले आहेत तोच नीट सांगू शकेल. परंतु साधारणपणे सर्व मांसाहारी प्राणीही असे 'दुर्बल' प्राणीच खाताना दिसतात. वाघाने लांडग्याची किंवा बिबट्याची शिकार केल्याचे ऐकिवात नाही . शिवाय ज्या प्रमाणात हरणांची, सश्यांची मानवाची शिकार केलेली आहे, त्या प्रमाणात वाघ सिंहांची केली असती तर आज ते प्राणी चित्रातही पहायला मिळाले नसते (इतकी त्यांची वीण कमी असते). आणि शतकानुशतके मारून खाल्ल्यावरही पुरून उरतील, इतकी त्या दुर्बळ प्राण्यांची वीण पक्की आहे (म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टीकोनातून पाहील्यास हरिणे, बकर्या वगैरे टिकाव धरण्यात अधिक वाकबगार आहेत). ज्याप्रमाणे वाघ हरिणांवर 'मर्दुमकी' गाजवते, त्याच प्रमाणे हरिण गवतावर गाजवते. माणुस ते प्राणी खातो कारण ते खाण्यास अधिक योग्य असावेत (आणि म्हणुनच कदाचित दुर्बळ).