**शतपावली** येथे हे वाचायला मिळाले:
ग्रंथालयाच्या भिंतीवरील घड्याळाच्या टोल्यांनी मला दचकुनच जाग आली. तशीच अर्धवट झोपेतच धपडत उठताना मी घड्याळाचे एकूण चार टोले ऐकले. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर खूप अंधारलेलं वातावरण दिसलं आणि त्याच खिडकीतून दिसणार्या घड्याळात चार वाजलेले दिसले. युनिव्हर्सीटी लायब्ररी ऑक्टोबर पासूनच पाच वाजता बंद व्हायला सुरूवात झालेली त्यामुळे लक्षात आलं की आज आपलं लायब्ररीत जायचं राहून गेलं. एकदम पॉलने दिलेली पहिल्या निबंधाच्या पहिल्या ड्राफ्टची डेड लाईन आठवली. मणामणाचं ओझं एकदम माझ्या डोक्यावर कोणीतरी ठेवतंय असा भास झाला. मी तशीच मटकन बेड वर बसले. मला लक्षात ...