याशिवाय नंतर काही घरगुती उपाय आठवले , बघा ट्राय करा...
१. दिवसातून भरपूर ताक पिणे. ताकात मीठ न घालता थोडीशी साखर घालणे.
२. आले किसून त्यात लिंबाचा रस, शेंदेलोण/ पादेलोण/ मीठ घालून त्याचे पाचक करून ते फ्रीजमध्ये एका डबीत ठेवणे, दिवसातून अधून मधून थोडे थोडे जीभेवर ठेवणे. ह्याने पचन सुधारते, भूक वाढते, तोंडाला चव येते व पित्त कमी होते.
३. पंचामृत : सकाळी अनशा पोटी (इतर काहीही न खाता-पिता) पंचामृत [नैवेद्याची वाटी भरून किंवा फुलपात्र भरून तुमच्या आवडीप्रमाणे] घेणे. दूध+दही+मध+तूप+साखर, मिळाल्यास तुलसीपत्र.
४. कोकम/ अमसूल सरबत/ सार स्वरूपात घेणे किंवा अमसूल नुसते खाणे.
५. पचनशक्ती सुधारणे. तसेच अपचन होत असल्यास त्यासाठी आवश्यक उपाय करणे.
६. काही दिवस तिखट, मसालेदार, चमचमीत, तेलकट, पचायला जड पदार्थ टाळून काही फरक पडतो का ते पाहणे.