खारला उतरलात हेही कमी नाही. गर्दीमुळे
एकाची अवस्था
उतरता ये न अंधेरी, तसाच विरारला
गेलो.
अशी झाली होती.
बहुधा कवी 'बोरिवली (किंवा अंधेरी) स्लो'ने किंवा
'अंधेरी फास्ट'ने प्रवास करत असावा. 'उतरता ये न अंधेरी, तसाच विरारला
गेलो' हे बहुधा 'विरार फास्ट'ला व्हावे. तशीही 'विरार फास्ट' खारला थांबत
नसल्याने 'विरार फास्ट'ने खारला उतरणे अशक्य.
परळला जायचे होते तिथे मी खारला
गेलो
एक शंका: परळला जाणारी
गाडी पुढे खारला कशी जाईल? कवीला 'एलफिन्स्टन रोड' म्हणायचे असावे
काय?
(तशी 'विरार फास्ट' एल्फिन्स्टन रोडलासुद्धा थांबत नसल्यामुळे
कवी एल्फिन्स्टन रोडला उतरण्यासाठी - मुंबईत नवखा असल्याखेरीज किंवा
बसण्याची जागा मिळवण्याकरिता मरीन लाइन्सला चर्चगेटच्या दिशेने
जाणाऱ्या लोकलमध्ये टुण्णकन उडी मारून चढला असल्याखेरीज - 'विरार
फास्ट'मध्ये चढला नसावा हे उघड आहे. पैकी दुसऱ्या परिस्थितीतसुद्धा
सराईत किंवा निर्ढावलेल्या मुंबईकराकडून सहसा
चूक
होऊ नये.
आमची गोष्ट निराळी. आम्ही आयुष्यात एकदाच हा 'ऑपरेशन मरीन लाइन्स'चा प्रयोग
केला असता चर्चगेटला पोहोचल्यानंतर ती लोकल नेमकी - नक्की आठवत नाही, पण -
यार्डात जाणारी की 'सर्विस लोकल' की कायशीशी घोषित करण्यात आली.
चालायचेच!)
अवांतर: 'उतरता ये न अंधेरी,
तसाच विरारला गेलो' हे तरीही एक वेळ ठीक आहे. भर गर्दीच्या
वेळी सोडा, पण शनिवारी दुपारी उशिरासुद्धा विरार
लोकलमध्ये बोरिवलीला चढून दहिसरला उतरणे हे
त्याहूनही मोठे असे एक दिव्य आहे हे (एका वेळच्या) स्वानुभवाने नमूद करू इच्छितो. एक
तर चढल्यानंतर एकाच स्टेशनानंतर उतरायचे असते, त्यात पुन्हा
बोरिवलीचे आणि दहिसरचे फलाट गाडीच्या विरुद्ध बाजूस येतात असे काहीसे
अंधुकसे स्मरते. (चूभूद्याघ्या.)