लेख आवडला. भारतात साक्षात्कारी संतांची आणि सत्पुरुषांची मोठी परंपरा आहे. वीतराग, अनिकेत व अयाचित वृत्तीने कठोर संन्यस्त जीवन जगणारे कित्येक योगी या भूमीत होऊन गेले.
आता सगळ्याच गोष्टींचा विपर्यास केला जातो. मोठमोठ्या अमूर्त कल्पनांचे पतंग उडवत ऐदीपणे जगणाऱ्या भोगवादी महाभागांनी अशा लोकोत्तर योग्यांचा 'भगोडे' म्हणून उपहास करावा, ढापलेले फटाके उडवत ज्ञानाची दिवाळी साजरी करावी आणि मोठ्या अधिकारवाणीने सामान्यांचा बुद्धिभेद करावा हा प्रकार बोकाळला आहे. एकूण "कैसी चली है अब के हवा तेरे शहर मे, बंदे भी हो गये है खुदा तेरे शहर मे" अशी परिस्थिती आहे. खऱ्या सत्पुरुषांविषयीचे असे लेख त्यामुळे अधिकच मूल्यवान वाटतात.