सांगत्ये ऐका... येथे हे वाचायला मिळाले:

अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात प्रवरेकाठी मालुंजे हे आमचे गाव वसले आहे. पंढरपूरला भीमा जशी दक्षिणमुखी होऊन तिची चंद्रकोर तयार झाली आहे, तशी प्रवराही इथे दक्षिणमुखी झाली आहे व तिची सुरेख चंद्रकोर तयार झाली आहे. नदीच्या दोन्ही तीरांवर पेशवेकालीन विठ्ठल-रुक्मिणीच्या सुरेख मूर्ती असलेली मंदिरे आहेत. घराण्याचे मूळपुरूष नारोपंत रत्नपारखी यांच्याविषयी एक आख्यायिका सांगतात ती अशी - नारोपंत राघोबादादांच्या दफ्तरी चाकरीस होते. राघोबादादांचा एकदा गोदातीरी कोपरगावला मुक्काम पडला. राघोबादादा मोठे धार्मिक. रोज सकाळी मोठी पूजाअर्चा चाले. पूजेसाठी ...
पुढे वाचा. : नाना