बेडूक, खेकडे, गांडुळे, गोचिडी, टमगिरे (हे जे कोणी असतील ते), डास, घुबडे, सुरवंट, ढेकूण, गोमाश्या, सरडे, उवा, टोळ, साप, विंचू, उंदीर, पाली हे सर्व प्राणिविशेष माणसाच्या मानाने नेमके सबळ की दुर्बळ? यांपैकी बेडूक आणि खेकडे वगळता बाकी कोणी रांधले जात असल्याचे निदान मी तरी ऐकलेले नाही. (अर्थात जगाच्या पाठीवर कोठे ना कोठे रांधले जात असतीलही, पण मला माहीत नाही. साप, टोळ, घुबडे वगैरेंबद्दल कल्पना करता येते, पण ढेकूण, गोचिडी, डास, गोमाश्या वगैरे तेवढे कष्ट घेण्यालायक कोणाला वाटतील, असे वाटत नाही. खूपच लहान पडतात.)