पुलंच्या बटाट्याच्या चाळीतून दिसणारी संपन्नता वगैरे, ८० व ९० च्या दशकांतले चाळींतील सहजीवन आणि चाळींची सद्यस्थिती यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे, हे नक्की. चित्रपट अद्याप पाहिलेला नाही; मात्र चित्रपटातल्या ज्या प्रसंगांबद्दल तुम्ही मत व्यक्त केले आहे, ते प्रसंग अतिरंजित नसावेत, असे वाटते. त्यामुळे चित्रपट पाहताना बटाट्याच्या चाळीशी तुलना केली जाणे काहीसे नैसर्गिकच असले, तरी टाळता आल्यास उत्तम, असे वाटते.

गिरणगावातील, दादर, गिरगाव वगैरे परिसरातील चाळींची सद्यस्थिती फारशी स्पृहणीय नाही हे नक्की.

लालबाग परळ हा चित्रपट गिरणी कामगारांच्या पंचवीस वर्षांपू्र्वी झालेल्या संपावर आधारित आहे असे वर्तमानपत्री लेखांवरुन समजते. हा चित्रपट पाहिलेला नसला किंवा चाळीतले जीवनाशी माझा सुतराम संबंध आला नसला तरी, चित्रपट ज्या नाटकावर आधारित आहे ते पाहण्यात आलेले 'अधांतर' हे नाटक आणि नाटकाचे लेखक व चित्रपटाचे कथाकार जयंत पवार यांचे वाचनात आलेले काही लेख (उदा. हा ) यावरुन असा अंदाज बांधता येतो की ८० व्या दशकातले जयंत पवार यांनी वर्णिलेले कामगारांचे तत्कालीन चाळजीवन व तुम्ही वर लिहिलेले सद्यकालीन चाळजीवन यात फारसा फरक नसावा.

म्हणजेच 'सद्यस्थिती फारशी स्पृहणीय नाही' याचा अर्थ 'तत्कालीन स्थिती स्पृहणीय होती' असा घेऊ नये असे वाटते.

बाय द वे, बटाट्याच्या चाळीत कुठे संपन्नता दिसली नाही, हेही आवर्जून नमूद करावेसे वाटते.