विजय, हरिभक्त आणि सौरभ सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
हरिभक्त महोदय, जनार्दन स्वामींनी नागपुरात सांघिक योगासनांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचे मोल आज नीट समजून घेणेही कठीण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जो प्रतिसाद लिहीला आहेत तो खरोखरीच समयोचित आहे.
वीतराग = राग म्हणजे योगिक साहित्यात प्रेम. रागावर विजय मिळवलेला तो वीतराग.
अनिकेत = निकेत म्हणजे घर. अनिकेत म्हणजे घर नसलेला.
अयाचित = याचित म्हणजे मागितलेला. अयाचित म्हणजे न मागता. कशाचीही मागणी न केलेला/करणारा.