पूर्वीचे मराठी सिनेमे फार म्हणजे फारच रडके असत. चित्रपट संपल्यावर प्रेक्षक फारच अस्वस्थ होत.
लेखिकेनी लिहिलेली 'शोले' बद्दलची आठवण निदान लहान मुलीची तरी आहे. पण आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या आईचे साठी उलटलेले काका त्यांच्या कुटुंबियांसमवेत 'चिमणी पाखरं' (की 'दूधभात' ते नक्की आठवत नाही) हा चित्रपट पाहायला रात्रीच्या शो ला गेले होते. त्यात शेवटी आईवडिलांचा अचानक मृत्यू झाल्यमुळे त्यांची पोरकी झालेली मुलं अनाथालयात नेऊन सोडल्याचं दाखवलं होतं. त्या रात्री आईचे काका रात्रभर झोपले नाहीत. सारखे आंथरुणावर उठून बसायचे. काय होतंय म्हणून विचारलं तर म्हणायचे "काय झालं असेल रे त्या पोरांचं पुढे? "
इतरांचं जाऊ द्या. 'पोस्टातली मुलगी' या लहानपणी न पाहिलेल्या चित्रपटाची नुसती गोष्ट मोठेपणी ऐकल्यावर मीही काही वेळ अस्वस्थ झालो होतो.