चल, जाऊ आठवणींच्या गावा येथे हे वाचायला मिळाले:
एम ऐस इ बी ची कॉलनी असल्यामुळे पोफळी तसं मागासलेलं नव्हतं तरी सुट्यांसाठीचे म्हणून असे काही विशेष उपक्रम तिथे राबवले जात नसत. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे दिवसभर भटकणं हा कार्यक्रम ठरून गेल्यासारखा.. त्यात आम्ही कधीच खंड पडू देत नसू आणि आमच्या घरातली मोठ्ठी मंडळी देखिल आम्हाला मनोसोक्त उनाडक्या करू देत असे. ( तेवढीच भुणभूण कमी) मग आम्ही बच्चे कंपनी कोणी राहत नसलेली.. किंवा घरातली कंपनी गावाला गेलीत अशी एकांडी घरं शोधून त्या त्या घराच्या आवारात असलेली आंबा, चिंच, पेरू, जांभळाची झाडं पालथी घालत असू.