गटारीबाबतचा माझा मुद्दा किंचित गडबडीत दिलेल्या प्रतिसादामुळे थोडा अर्धवट झाला आहे त्याबाबत क्षमस्व. सदर मुलगा व मुलगी दोघेही पुण्यात संगणक कंपन्यांमध्ये नोकरी करतात. मात्र मुलाच्या मूळ गावी (जेथे त्याचे आईबाबा राहतात त्या) घरासमोर गटार आहे हे त्या मुलीच्या नकाराचे कारण आहे. अशा अपेक्षांना माझ्या मते अवास्तव व हास्यास्पद हे एकमेव नाव देता येईल. अर्थात अशा अपेक्षांना मुरड घालणे शक्य नसल्यास मुलींना तसे स्वातंत्र्य आहेच. मध्यंतरी आदित्य जोशी या जालावरील लेखकाने कुठल्यातरी ब्लॉगावरील प्रतिसादात एक अनुभव सांगताना भारतीय पद्धतीचे शौचकूप घरामध्ये आहे या कारणामुळे एका मुलीने त्याच्या मित्राला नकार दिल्याचे उदाहरण दिले होते. तेही या निमित्ताने आठवले. त्याचा दुवा शोधून मिळाल्यास अवश्य देईन.

एकंदरीत व्यक्तीस्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना व स्वतःच्या अपेक्षा यांबाबत पुरेशी प्रगल्भता नसल्याने असे प्रसंग उद्भवतात असे वाटते.