'मुलापेक्षा, तो किती संपन्न आहे हे हल्ली महत्त्वाचे आहे' अशी या वाक्याची फोड असावी असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

थोडक्यात, 'मुलाचे गुण, स्वभाव, होतकरूपणा (पोटेन्शियल अशा अर्थी) यांपेक्षा त्याची सद्य (प्रीएक्झिस्टिंग, वाडवडिलार्जित, थोडक्यात बापकमाई अशा अर्थी) आर्थिक परिस्थिती हल्ली महत्त्वाची झाली आहे' असे यातून सुचवायचे असावे.

विधानाबाबत मिश्र भावना नोंदवू इच्छितो. म्हणजे या कलात (ट्रेंड अशा अर्थी) नेमके नवीन असे काही नसावे, परंतु याचे प्रमाण आजकाल खूपच अधिक बोकाळू लागलेले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (खात्री नाही.)