>>भारतीय पद्धतीचे शौचकूप घरामध्ये आहे या कारणामुळे एका मुलीने त्याच्या मित्राला नकार
संभाव्य कारणे -
पाश्चिमात्य पद्धतीचे शौकू वापरायची सवय असेल आणि घरात फक्त भारतीय पद्धतीचेच आहे असे झाले असेल.
भारतीय पद्धतीचे शौकू घासायला/ साफ करायला त्रासाचे वाटत असेल.
अश्या परिस्थितीत आयुष्यभर या गोष्टीवर वाद घालणे, किंवा घरात बदल करवून घेणे अश्या पर्यायांपेक्षा, नकार देणे सोयिस्कर नाही का? हव्या त्या प्रकारचे शौकू घरात असणारे इतर पुष्कळ उमेदवार असताना?
माझ्या एका मैत्रिणीने लग्नाआधी घर घेतले. (आमच्या गटातल्या सगळ्यांनीच घरे घेतली खरे तर) एका मुलाने कांदेपोहे कार्यक्रम झाल्यानंतर मुलामुलीला एकट्याना बोलायला सोडतात त्यावेळेत, त्याने कसे घर घेतले आहे व त्याचे हप्ते आहेत आणि त्यामुळे तिच्या पगाराचा कसा विनिमय करावा लागेल वगैरे सांगायला सुरुवात केली. त्यावर तिने माझेही हप्ते आहेत हे सांगितल्यावर - मुलीने लग्नाआधी घर घेतले आहे या मुद्द्यावर नकार दिला.
प्रत्येकाच्याच काहीना काही अपेक्षा असतात. पूर्वी सगळ्यांचा अपेक्षा ठराविक स्वरूपाच्या (स्टीरिओटाईप) असायच्या. आता त्यात वैविध्य आले आहे. पूर्वी मुली स्वतंत्र विचार करू शकत असतच असे नव्हते, आर्थिक स्वातंत्र्य नव्हते; त्यामुळे त्यांची मुरडीची मर्यादा मोठी होती. ती आता कमी झाली आहे. पण मला अजुनही ती मुलामुलीत समान झाली आहे असे वाटत नाही.