लिहिण्याची शैली छानच आहे..प्रत्येकाच्याच मनात  मामा-मामी, मामेभावंडं या सगळ्यांच्या आठवणी आजोळच्या घराला लपेटून बसलेल्या असतात.सुट्टीत आजोळी गेल्यावर मामीच्या हातची पक्वान्नं खायला मिळाली नाहीत असं कधी होत नसे..

आपल्याकडे लोकगीतांतून ही सर्व नाती फार सुंदर रीतीने व्यक्त होताना दिसतात.एक लोकगीत आठवते..

डोल ग जांभळी डोलाच्या, डोलाच्या

रत्नासारख्या बोराच्या, बोराच्या

एक बोर नेलं काऊने, काऊने

बाळाला नेलं मामाने, मामाने

मामाचा गाव कुठे आहे, कुठे आहे.

दारी पिंपळ जिथे आहे, जिथे आहे.

पिंपळाला लागली पिंपळफळं, पिंपळफळं.

मामीच्या दारी लेकरंबाळं,लेकरंबाळं.

मामीच्या अंगी कापडचोळी, कापडचोळी.

कर ग मामी पुरणपोळी, पुरणपोळी.

पुरणपोळीशी नाही तूप,

बाळाला लागली भूक.