माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर! येथे हे वाचायला मिळाले:
मराठी भाषेत आत्तापर्यंत लिहिल्या गेलेल्या कवितांची संख्या जर कुणी काढली तर ती नक्कीच काही लाखांचा आकडा पार करेल. 'कविंची वीण मोठी!' तेव्हा त्यांच्या अपत्यांची संख्या इतर काव्यप्रकारांपेक्षा जास्त असावी हे ओघानेच आले. पण 'काळ हा सर्वोत्तम समीक्षक आहे!' हे गंगाधर गाडगीळांचे म्हणणे खरे मानले तर काळाच्या तडाख्यातून वाचलेल्या नि आजही काव्यरसिकांच्या तोंडात खेळणार्या कविता काही मोजक्याच. त्यात ज्ञानेश्वर, रामदास नि तुकाराम अशा काही मातब्बर मंडळीच्या रचना सोडल्या तर आधुनिक कविता अजूनच थोड्या. मराठी साहित्यक्षेत्रातली अशीच एक अजरामर कविता आजच्या ...