माझ्या एका मैत्रिणीने लग्नाआधी घर घेतले. (आमच्या गटातल्या सगळ्यांनीच
घरे घेतली खरे तर) एका मुलाने
कांदेपोहे कार्यक्रम झाल्यानंतर मुलामुलीला एकट्याना बोलायला सोडतात
त्यावेळेत, त्याने कसे घर घेतले आहे व त्याचे हप्ते आहेत आणि त्यामुळे
तिच्या पगाराचा कसा विनिमय करावा लागेल वगैरे सांगायला सुरुवात केली.
त्यावर तिने माझेही हप्ते आहेत हे सांगितल्यावर - मुलीने लग्नाआधी घर
घेतले आहे या मुद्द्यावर नकार दिला.
अशा मुद्द्यांवर नकार देणे उत्तम. किंबहुना आर्थिक कारणांसासाठी तडजोडी करणे महाकठीण असते.
(तुमच्या मैत्रिणीने कुठे घर घेतले हे माहीत नाही किंवा जाणून घेण्याचीही इच्छा नसली तरी) पुण्यासारख्या ठिकाणी सध्या किमान ४० ते ५० लाख रुपयांची गुंतवणूक घरासाठी आवश्यक आहे. अशा घरांसाठीचे हप्ते दीर्घकाळ फेडत बसावे लागतात. म्हणजेच हे दरमहा व दीर्घकालीन करावे लागणारे कॉन्ट्रिब्युशन आहे. (४० लाखाच्या कर्जासाठी २० वर्षासाठीचा सरासरी व्याजदर ९.७५ टक्के पकडून २० वर्षासाठीचा हप्ता काढला तर तो ३८००० रुपये प्रतिमाह येतो.)
अशा परिस्थितीत आर्थिक कुचंबणा होणे शक्य आहे का? दोघांनाही इतके दिवस इतका हप्ता देणे परवडेल का? या बाबतीत तडजोड कशी शक्य आहे याचा विचार मुलगा व मुलगी दोघांनीही केला ही उत्तम गोष्ट वाटते.