आजही वर्तमानपत्रात ''वधू पाहिजे'' जाहिरातीत ''गोरी, सुंदर, मनमिळाऊ, स्मार्ट व गृहकृत्यदक्ष'' मुलगीच बायको म्हणून हवी असते! मला सांगा, अशा मुली काय झाडाला लागतात का? शिवाय तिला नोकरीही हवी असते, सरकारी नोकरी असेल तर अजून उत्तम! पण त्या नोकरीच्या वेळा, स्वरूप मर्यादित हवे असते. चष्मा नको असतो. पत्रिकेत मंगळ नको असतो. घरची जबाबदारी नको असते. कर्ज नको असते. आजही समाजात वर्णाने काळ्या, जाड्या, बुटक्या, नोकरी नसलेल्या, पत्रिकेत मंगळ असलेल्या, चश्मिस्ट मुलींना लग्नासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना मुलांकडून चटचट होकार येत नाहीत. शेवटी होकार आलेले स्थळ किंचित डावे असले तरी नाईलाजाने [लग्न होणे आवश्यक वाटत असल्यास] तडजोड करावी लागते.