आयुर्वेदाप्रमाणे ज्या ज्या फळ, भाज्या, पदार्थांचा मधुर विपाक असतो ती ती फळे, पदार्थ इ. खाणे आम्लपित्ताचा त्रास असलेल्यांना इष्ट असते.
उदा. ताक, आवळा, दुधीभोपळा, जांभूळ, ज्येष्ठमध ही मला माहीत असलेली उदाहरणे. असे पदार्थ खाल्ल्याने दाह होत नाही.
याउलट काही भाज्या/ पदार्थ तीक्ष्ण मानले गेलेत : उदाः सिमला/ ढब्बू मिरची, गवार, शेवगा, मिरची इ. त्या त्या भाज्या टाळाव्यात.
सकाळी उठल्या उठल्या पेठा/ कोहळेपाक खाल्ला तरी पित्त होत नाही असे म्हणतात.
अशा अनेक गोष्टी आहेत.
पित्ताची सवय जुनी असेल तर वरील सर्व घरगुती उपाय थोडे दिवस सलग केल्यावर मगच परिणाम दिसेल हे ध्यानी घ्यावे. एका दिवसात फटकन बदल दिसणार नाही. योग्य व्यायाम, पुरेशी झोप, बाहेरचे/मसालेदार इ. इ. खाणे टाळणे, पुरेसा व योग्य आहार, तणावरहित मन या सर्वांनी आम्लपित्ताचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो व कालांतराने गायब होऊ शकतो असा अनुभव आहे.
तसेच शक्य होईल तेव्हा अंगाला तेल लावून मसाज करून मग आंघोळ करावी. आठ दिवसातून एकदा तरी तेल लावावे. तळपाय, बेंबीच्या भोवती व मस्तकाच्या शिखेला तेल लावून ते जिरवावे. त्याने अंगातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते.