पण म्हणून ह्या गरजेच्या वस्तू केंव्हाही घेता येतात... त्या नसणे म्हणजे "भिकारडेपणा" कसा म्हणता येईल?

म्हणणाऱ्याने काहीही म्हणावे, जगात सर्व प्रकारचे लोक असतात, प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला एकएक तरी असतेच, वगैरे वगैरे... स्पष्ट म्हटले तर बरेच समजावे, अनायासे टार्गेट सेट (मराठी?) कमी होतो, त्यामुळे "गुड रिडन्स" (पुन्हा, मराठी?) म्हणून सोडून द्यावे. टार्गेट सेट श्रिंकत श्रिंकत नल सेट बनेल याची चिंता मुळीच बाळगू नये. (मी विवाहित आहे, आणि) जगात जर माझ्यासारख्या माणसाचेसुद्धा लग्न होऊ शकते, तर कोणाचेही होऊ (आणि टिकू) शकते, याबद्दल दिलासा बाळगावा. (इतक्या चांगल्या कारणाकरिता जगातील सर्व पुरुषांचा लसावि - की मसावि? माझा नेहमी घोळ होतो! - मानला जाण्यास माझी मुळीच हरकत नाही, उलट तो मी माझा गौरव समजेन.) शोधा, म्हणजे सापडेल! (अर्थात, भरपूर वेळ द्यावा लागेल - 'इन लाइफ़, देअर आर नो इन्स्टंट सोल्यूशन्स', आणि शोध तुम्हाला स्वतःलाच घ्यावा लागेल आणि सतत घेत राहावा लागेल - 'थांबला तो संपला', हा भाग आहेच.) आणि अखेरीस, 'यू गेट द स्पाउस यू डिज़र्व' (की 'यू डिज़र्व द स्पाउस यू गेट'? माझा यातही नेहमी गोंधळ होतो. चालायचेच!) हेही लक्षात घ्यावे. (शेवटचे विधान उभयपक्षी लागू असावे. चूभूद्याघ्या.)

लग्नापुर्वी एकट्याला इतक्या सगळ्या वस्तुंची गरज नसते हो.

सहमत. ('क्यों कि विवाहित पुरुष भी कभी बॅचलर था'. असो.)

अवांतर: माझ्या घरी आजही प्लाज़्मा टीव्ही नाही. (किमान या कारणासाठी तरी) माझी बायको मला सोडून जाण्याचा विचार करेल असे वाटत नाही. किंबहुना पुढेमागे प्लाज़्मा टीव्ही घेण्याचा फारसा गंभीर विचार आम्ही दोघांनीही केलेला नाही. 'आहे तोच बघितला जात नाही, करायचाय काय प्लाज़्मा टीव्ही' असाच उभयपक्षी सूर आहे. घरात प्लाज़्मा टीव्ही नाही यावरून आमची ऐपत किंवा लायकी ठरवण्याचा प्रकार दोघांचेही पालक करणार नाहीत, आणि यदाकदाचित केलाच (म्हणजे पालक करणार नाहीतच, पण इतर नातेवाइकांनी), तर त्याला (आपापल्या बाजूकडच्यांना) यथोचित उत्तर द्यायला आम्ही दोघेही खंबीर आणि समर्थ आहोत.

असोच!

अतिअवांतर: माझा तथाकथित 'प्रेमविवाह' वगैरे नाही. रीतसर ठरवून केलेला आहे. तेही असोच!