अरे आपण सिँहाचे छावे आहोत, समोरासमोर गर्जना करायची आपण! आपण सगळे मराठमोळे मावळे आहोत, खऱ्या समशेरी घेऊन हल्ला करायचा आपण! आपल्या आवाजात आसमंत दणाणून टाकणारी जरब असावी, वाघाची ती डरकाळी व्हावी, मांजराची मँव मँव नको!
या अनावश्यक आक्रमक शिवसेनट भाषेचे प्रयोजन कळाले नाही. कसली गर्जना कसली डरकाळी आणि कसल्या समशेरी? रोजच्या आयुष्यात किती वेळा तडजोड करावी लागते, किती लाळघोटेपणा करावा लागतो आणि किती लोकांच्या ताटाखालचे मांजर होऊन जगावे लागते हे स्वतःशी प्रामाणिक होऊन पाहावे. काहीतरी सनसनाटी लिहायचे आणि खळबळ माजवून द्यायची हे आंतरजालावरचे नवीन फॅडच झाले आहे.
(संपादित : प्रशासक)